इनॉर्बिट मॉलमध्ये पुरुष दिनानिमित्त फॅशन प्रदर्शन

‘ब्लॅक फ्रायडे’ला ‘बेस्ट फ्रायडे फॉरेव्हर’ची जोड; २६ ते २९ नोव्हेंबरदरम्यान खरेदीची पर्वणी

Nov 19, 2026 - 17:47
 0
इनॉर्बिट मॉलमध्ये पुरुष दिनानिमित्त फॅशन प्रदर्शन
इनॉर्बिट मॉलमध्ये पुरुष दिनानिमित्त फॅशन प्रदर्शन

मुंबई : आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे औचित्य साधून मालाड येथील इनॉर्बिट मॉलमध्ये पुरुषांच्या फॅशनविश्वाची झलक दाखविणारे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान मॉलमधील विविध ठिकाणी पुरुषांच्या पेहरावाचे प्रदर्शन मांडण्यात आले असून, त्याचबरोबर ग्राहकांना मनोरंजनाची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यानंतर २६ ते २९ नोव्हेंबरदरम्यान मॉलमध्ये चार दिवसांची ‘बीएफएफ – बेस्ट फ्रायडे फॉरेव्हर’ ही ब्लॅक फ्रायडे विशेष विक्री मोहीम राबविण्यात येणार आहे.

पुरुष दिनानिमित्त आयोजित या उपक्रमांतर्गत मॉलमध्ये विविध ब्रँडच्या पुरुषांच्या कपड्यांचे आणि फॅशनसंबंधित वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. २० ते २२ नोव्हेंबर या कालावधीत ग्राहकांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुरुषांच्या फॅशनमधील विविध पर्यायांची माहिती घेता येणार आहे. मॉलच्या तळमजल्यावर एच अँड एमच्या समोर टाइमझोनचा ‘हाय फाइव्ह सेन्सर गेम’ही आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी ग्राहकांना क्यूआर कोड स्कॅन करून खेळाचा आनंद घेता येईल.

दरम्यान, ब्लॅक फ्रायडेच्या निमित्ताने इनॉर्बिट मॉलने ‘बेस्ट फ्रायडे फॉरेव्हर’ ही संकल्पना मांडली आहे. मित्रमैत्रिणींसोबत खरेदीसाठी बाहेर पडणे, केवळ पाहण्यासाठी गेलेल्या दुकानातून आवडलेला पोशाख खरेदी करणे किंवा कोणतेही विशेष निमित्त नसतानाही स्वतःसाठी आवडीची वस्तू घेणे, अशा खरेदीच्या अनुभवाला या मोहिमेतून उजाळा देण्यात येणार आहे. यासाठी मॉलच्या मध्यवर्ती भागातील अॅट्रियममध्ये विशेष संकल्पनाधारित सजावट करण्यात येणार आहे. 

चार दिवस चालणाऱ्या या खरेदी महोत्सवात जॅक अँड जोन्स, स्वारोवस्की, सॉल्ट, स्पायकर, ट्रेसमोड, बिबा, फॉरेव्हर न्यू आणि बाथ अँड बॉडी वर्क्स यांसारख्या ब्रँड्सकडून खास सवलती दिल्या जाणार आहेत. यामुळे ग्राहकांना कपडे, चप्पल-बूट, दागिने आणि वैयक्तिक वापराच्या वस्तू खरेदी करण्यासाठी अनेक पर्याय मिळणार आहेत. मॉलच्या मध्यभागी खास सजावट केली जाणार आहे. या सजावटीतून मित्र-मैत्रिणींसोबतच्या मैत्रीचा आनंद आणि उत्साह पाहायला मिळणार आहे. यामुळे मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांसोबत खरेदीला जाण्यासाठी एक छान वातावरण तयार होणार आहे.